युरोपात ज्या काळात स्वतःविषयीच्या जाणिवांचा विचारही नव्हता, त्या काळात आशियाई जगताने आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षणही केले होते!
या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात महान आशियाई जगतात जगलेल्या, नोकरी-व्यवसाय आणि प्रवास केलेल्या एकेका माणसाच्या स्मृतिग्रंथावर आधारित आहे. प्रकरणाच्या सुरुवातीला त्या माणसाच्या प्रवासाचा काळ दिलेला आहे. या निर्भयी आणि साहसी माणसांनी समुद्र सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांच्या खिंडी पार केल्या. तेव्हा ‘आशिया’ हा विस्मयजनक, एकसंध आणि सर्जनशील प्रदेश होता.......